जिल्ह्यात आज ७४ कोरोनाबाधितांची वाढ

Foto
जिल्ह्यात आज सकाळी आलेल्या कोरोनाच्या अहवालानुसार ७४ कोरोनाबाधितांची वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाच्या रुग्णांची संख्या ही १६ हजार ८२७ वर जाऊन पोहचली आहे. 

जिल्ह्यातील आतापर्यंत आढळून आलेल्या एकूण १६८२७ कोरोनाबाधितांपैकी आतापर्यंत १२३४६ जण बरे होऊन घरी गेले आहेत. तर आजपर्यंत ५५४ रुग्णांचा मृत्यू झाला असल्याने सध्या ३९२७ रुग्णांवर उपचार सुरु आहे. 
शहरात आढळले ५५ रुग्ण
शहरात आज सकाळी आलेल्या पहिल्या टप्प्यात ५५ रुग्ण आढळून आले आहेत. त्यात एन नऊ, सिडको-१, बनेवाडी-४, नगारखाना गल्ली -२, अजबनगर-१, प्रियदर्शनी कॉलनी,सिडको -१, कांचनवाडी-१, हिंदुस्तान आवास, कांचनवाडी-२, श्रीकृष्णनगर -१, मिलिट्री हॉस्पीटल-१, ध्यानमंदिर, नारळीबाग-१, साईकृपा सोसायटी बजरंग चौक, एन सहा सिडको-१, इतर-१, नाझलगाव-१, घाटीपरिसर-१, एन आठ, आझाद चौक-१, गजानननगर-१, श्रेयनगर-१, शिवाजीनगर-२, जवाहरनगर-४, गुरूदत्तनगर-१, हर्सुल टी पॉइंट-१, गणेश कॉलनी-१, सह्याद्रीहिल-१, न्यायनगर -२, एन दोन, पायलट बाबानगर-१, बालाजीनगर-३, गांधीनगर-४, नवयुग कॉलनी, भावसिंगपुरा-१, राजीव गांधीनगर, मुकुंदवाडी-३, एन चार सिडको-१, खंडोबा मंदिराजवळ, सातारा परिसर-८ या भागातील रुग्णांचा समावेश आहे. 
ग्रामीण भागात १९ रुग्ण 
ग्रामीण भागात १९ रुग्ण आढळून आले आहेत. त्यात करमाड-३, गोपाळपूर-१, वाळूज-४, पाचोड, पैठण-१, बजाजनगर-१, सारा वृंदावन सोसायटी बजाजनगर-१, देवगिरी सोसायटी बजाजनगर-२, छत्रपतीनगर, वडगाव-१, गोपीनाथ चौक, बजाजनगर-१, पिशोर, कन्नड -१, चित्तेगाव-१, मेनरोड, ‍सिल्लोड-१, पैठण-१ या भागातील रुग्णांचा समावेश आहे. 
पाच कोरोनाबाधितांचा मृत्यू
खासगी रुग्णालयांमध्ये नारेगावातील ५८ वर्षीय रुग्ण, गारखेड्यातील ३२ वर्षीय स्त्री, मुकुंदवाडीतील ५८ वर्षीय रुग्ण, बीड बायपास येथील ६२ रुग्ण आणि जयभवानी नगरातील ३३ वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker